आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमगरवाडीतील पालावरची शाळा "प्रिसीजन'मुळे जगाच्या उंबरठ्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - "समाजातीलदुर्लक्षित घटकांसाठी गेल्या २३ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याची "प्रिसीजन'ने दखल घेतली. त्यामुळे आनंद आणि समाधान वाटते. तसेच अशाप्रकारे या कार्याला हातभार लावणाऱ्यांमुळे आणखी कामाची प्रेरणा मिळते,' अशी प्रतिक्रिया भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ. प्रा. सुवर्णा रावळ यांनी व्यक्त केली.
गेल्या पाच वर्षांपासून येथे प्रिसीजन गप्पा हा कार्यक्रम घेणारी प्रिसीजन कॅमशाफ्ट ही कंपनी समाजाच्या विविध क्षेत्रातील कार्याचाही गौरव करते. या कंपनीचा यंदाचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार यमगरवाडी (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथे भटक्या विमुक्तांसाठी शाळा चालवणाऱ्या भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानला घोषित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या "दिव्‍य मराठी'शी बोलत होत्या.
"हे विद्यापीठ आजच्या परिप्रेक्ष्यातून नसेल,' असे सांगून डॉ. रावळ म्हणाल्या, "हे विद्यापीठ भटक्या विमुक्तांचा मानस, प्रचंड कौशल्य याला अनुरूप असेल. भटके विमुक्त हे संस्कृतीचे रचनाकार, वाहक आणि प्रवाहक आहेत. त्यामुळे या विद्यापीठातून भटक्या विमुक्तांच्या सामाजिक, शैक्षिणक, आर्थिक विकासाबरोबरच संशोधन होईल. तसेच त्यांच्या कला, धैर्य, शौर्य संस्कृती आदी अनेक गुणांचा विकास आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील. लवकरच व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले जातील.
१९९१ पासून प्रतिष्ठानचे कार्य सुरू झाले. १९९३ मध्ये यमगरवाडी येथे एकलव्य विद्या संकुलाची स्थापना केली. प्रतिष्ठानमार्फत शिक्षण, आरोग्यासह विविध सेवाकार्ये सुरू आहेत. तसेच संगीत, गायन, लोककला आदी उपजत गुणांचा विकास आणि त्यांना चालना देण्यासाठी सांस्कृतिक दल, क्रीडाकुल यांची निर्मिती केेली आहे.'

१४ नोव्हेंबर : सायंकाळी६.२५ वाजता आदित्य ओक सत्यजित प्रभूंचा जादूची पेटी कार्यक्रम
१५नोव्हेंबर : सायंकाळी५.०५ वाजता रमा माधव चित्रपट प्रदर्शन
सायंकाळी ७.४५ मृणाल कुलकर्णी हिची प्रकट मुलाखत
१६नोव्हेंबर : ६.२५,प्रिसीजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा
कलाग्राम : भटकेविमुक्तांच्या ५२ जातींच्या इतिहासाचा अभ्यास
पालावरचीशाळा : सर्वजातींसाठी शाळा सुरू करणार
सर्वेक्षण: भटके विमुक्तांची लोकसंख्या, राहणीमान यासह कौटुंबिक सर्वेक्षण, सध्या नऊ जिल्‍हांमध्ये सुरू
१९९३ : १८एकर जमिनीवर २५ पारधी समाजातील मुलांसह शाळेची सुरुवात
१९९५: लातूरच्याअनसरवाडा येथे गोविंद महाराज गोपाळ समाज प्रकल्पाची सुरुवात
१९९६: भटकेविमुक्त संशोधन समितीची स्थापना
२००१: हिंगोलीयेथे नाथजोगी समाज विकास सेवा संघाची स्थापना
२००३:पालावरची अनुभव शाळा या अभनिव उपक्रमाची सुरुवात
२०११:यमगरवाडी येथे एकलव्य विद्या संकुलाचे लोकार्पण
प्रतिष्ठानची अशीही वाटचाल...
यमगरवाडीचा हा प्रकल्प देशात पथदर्शी ठरतोय. जगमान्य "प्रिसिजन'ने गौरवल्याने हा प्रकल्प जगाच्या उंबरठ्यावर जातो आहे. लवकरच येथे विद्यापीठ उभारू.
डॉ.प्रा. सुवर्णा रावळ, अध्यक्ष,भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान