आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येडेश्वरीच्या यात्रेसाठी आठ लाख भाविक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरमाळा - ‘आई राजा उदो-उदो’चा जयघोष करीत आई येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी येरमाळा (ता. कळंब) येथील चैत्री यात्रेसाठी सुमारे 8 लाख भाविकांनी बुधवारी हजेरी लावली. हर्षोल्लासात आणि भक्तिभावाने चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम झाला. दरम्यान, ‘उदो उदो’च्या गजरात मातेच्या पालखीचे आमराईत आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली असून, भक्तीचा हा ओघ आणखी 4 दिवस राहणार आहे.

येडेश्वरी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या मुख्य दुसर्‍या दिवशी सकाळी 8.00 वाजता मंदिरातून मातेच्या पालखीचे आमराईकडे प्रस्थान झाले. या वेळी लाखो भाविकांची उपस्थिती होती. मंदिरापासून ते आमराईपर्यंत हलगी, झांज, संबळाच्या तालावर व ‘आई राजा उदो उदो’च्या नामघोषाने येरमाळानगरी दुमदुमून गेली होती. सकाळी 9.45 वा येथील बाजार चौकात भाविकांनी पालखी मार्गावर काढलेल्या रांगोळीवरून मातेच्या पालखीचे आगमन झाले.

वाहतूक विस्कळीत
यात्रेला दरवर्षी लाखो भाविक दाखल होतात. मात्र, नियोजन तोकडे पडते. त्यामुळे भाविकांना प्रचंड त्रास होतो. गावात आणलेली वाहने व भाविकांची गर्दी यामुळे मुख्य बार्शी- येरमाळा रस्त्यावर 1 किमीपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागून वाहतुकीचा अनेकदा खोळंबा होतो.