आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या पाचशे रुपयांसाठी सोलापुरात युवकाचा खून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दोन वर्षांपूर्वी हातउसने घेतलेले पाचशे रुपये देण्याच्या कारणावरून भरत ऊर्फ सुभाष अण्णाप्पा रजपूत (वय 25, रा. विजापूर नाका झोपडपट्टी नंबर दोन) या तरुणास झालेल्या हाणामारीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमाराला घडली.

विकास सुनील सरवळे (रा. विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विनोद रजपूत यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. विनोद व भरत दोघे भाऊ आहेत. हिप्परगा तलावात ते मासेमारीचा व्यवसाय करतात. विकास याच्याकडून विनोदने दोन वर्षांपूर्वी पाचशे रुपये हातउसने घेतले होते. शनिवारी रात्री विकास व विनोद यांच्यात त्यावरून भांडण झाले. भांडण प्रसंगी भरतने भावाला का मारत असल्याचे विचारत मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यावेळी विकासने त्याच्या डोक्यावर, छातीवर, पोटावर लाथाबुक्क्या मारून जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे भरतचा मृत्यू झाला. मध्यरात्री बाराच्या सुमाराला विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. विकासला अद्याप अटक झाली नसल्याची माहिती फौजदार सुनील पुंगळे यांनी दिली. भरत हा अविवाहित होता. त्याच्या मागे दोन भाऊ आहेत. विजापूर नाका पोलिसांनी शनिवारी रात्री परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या बंदोबस्ताचा ताण असल्यामुळे रविवारी तपास झाला नाही.