आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेच्या विश्वाने दिले तरुणीला स्वाभिमानी जगणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हाती असलेली कला केवळ कला ठेवली नाही तर आपल्या जीवनाचे साधन बनवले. छोट्या प्रमाणात असलेल्या ‘आर्ट लाइफ ’ या व्यवसायाचा विस्तार करून जिदद् अन् चिकाटीच्या बळावर तेजस्विनी कानडे या युवतीने आपल्या आयुष्याला समृध्द वळण दिले आहे.

व्यवसायाला वृध्दी मिळावी, त्यातून किमान दहा कुटुंबे जगावीत तसेच अर्थाजनही व्हावे यासाठी तेजस्विनी हॅन्डी क्राफ्ट अँड ट्रेनिंग सेंटरची स्थापना करून तेजस्विनीने 2000 मध्ये कार्याला सुरुवात केली. तिच्या या कलेला विविध प्रदर्शनाच्या माध्यमाने प्रसिध्दी मिळत गेली. आज तिने तिच्या सवे किमान 10 ते 15 कुटुंबांतील महिलांना काम देण्याचे बळ निमार्ण केलेले आहे.

समाजाचेही राखले भान

राज्यातील विविध सामाजिक संस्थांतील अंध व मूक-बधीर, मतिमंद विद्यार्थांना पेपर हँड बॅग्ज, की होल्डर, विविध प्रकारच्या गाड्या, छोटे फ्रे मस तयार करण्याचे प्रशिक्षण कानडेंनी दिले. पंढरपूरची पालवी संस्थाही त्यात अनेक वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे.

अशी मिळाली विद्या
1998 मध्ये पद्मजा देशपांडे या शिक्षिकेकडून कलेचे इत्यंभुत धडे तेजस्विनीने घेतले. कलेच्या शिक्षणात विविध प्रकारच्या संकल्पनांना स्थान देत प्रत्येक वेळी सुधारणा केली. त्या बळावरच तिने देशातील विविध शहर तसेच परदेशांतही आपली कलाकृती पोहचवली आहे.

हे करतात तयार
म्युरल्स, वॉल हँगिंग, की होल्डर, मॉर्डन आर्ट मिक्स आर्ट, कंम्पोझीट्स,डेंटल वर्क, एम सील वर्क, मिक्स आर्ट, अँक्रलिक, कोरियल वर्क, वूडन वर्क, ग्लास वर्क, फायबर वर्क असे विविध प्रकारचे वर्क करून त्याच्या व्यवसायाला अधिक महत्त्व दिले.

आत्मविश्वासाचं बळ
आपल्या कामावर विश्वास ठेवणे आणि त्यातून मार्ग काढणे हे महत्त्वाचे. छोट्या क लाकुसरीतून मोठा उद्योग उभा करता येऊ शकतो. त्यामुळे महिलांनी आपल्या छोट्या कलेला मोठे म्हणूनच पाहावे. हा आत्मविश्वासच बळ देतो. ’’
तेजस्विनी कानडे, उद्योजिका