आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात युवतीकडून सोनसाखळी हिसकावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पद्मनगरच्या मैदानाजवळून पायी जाताना पूजा राजेंद्र देशमाने (वय 20, रा. यल्लालिंगनर) यांच्या गळ्यातील अध्र्या तोळ्याची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी हिसकावली. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलिसात नोंद आहे. महिला साहाय्यक पोलिस निरीक्षक कांचन जाधव तपास करीत आहेत.

आठ जणांना मिळाला जामीन
देगावजवळील बसवेशवरवस्तीजवळ खासगी बस आणि ट्रॅक्टर यांच्यात धडक बसल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात खासगी बस पेटवून देण्यात आली होती. पंचवीस जणांना मारहाण झाली होती. या प्रकरणातील आठ जणांना सोमवारी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन मंजूर झाला. ही घटना 9 ऑगस्ट रोजी घडली होती. चालक इमामसाब वळसंग (इचलकरंजी), पवन शिरढोणे (कोल्हापूर), आदगोंडा पाटील (अथणी), सुनील होनशेट्टी (सांगली), प्रकाश पाटील (वाळवा), अजित शिंत्रे (कोल्हापूर), विपुल मगदूम (सांगली), राहुल कनवाड (कोल्हापूर) यांना दुपारी अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन मंजूर झाला. राजेंद्र कांबळे (कोळी) यांनी फिर्याद दिली होती.

दुसर्‍या घटनेत आदगोंडा पाटील यांनी फिर्याद दिली होती. सहा जणांना शनिवारी रात्री अटक झाल्यानंतर रविवारी त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. या घटनेतील मुख्य संशयित कांबळे (कोळी) यांच्यावर उपचार सुरू आहेत. आदगोंडा पाटील व त्यांच्यासोबत पंचवीस जण नागपूर येथील रामटेक येथे दीक्षा घेण्यासाठी जात होते. कांबळे व त्यांच्या साथीदारांनी मारहाण करून त्यांची बस पेटवून दिली होती.