आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण नव्हे; विजापूर पोलिसांनी नेले पकडून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - प्रियदर्शनी नगर हौसिंग सोसायटी, कुमठा नाका परिसरात राहणारा शंकर टेकचंद तोलानी (वय 20) या तरुणाचे अपहरण झाल्याची फिर्याद 7 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात नोंद झाली होती. फौजदार कुंदन सोनाने व त्यांच्या पथकाने सोमवारी या घटनेचा छडा लावला. त्याला विजापूर पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केल्याची माहिती त्यांनी दिली.

शंकर याच्याविरुद्ध विजापुरातील आदर्शनगर पोलिस ठाण्यात कलम (392- सोनसाखळी हिसकावणे) या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता. तपासात त्याचे नावे समोर आल्यानंतर 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेतीनच्या सुमाराला चार पुरुष व एक महिला असे पाचजण सुमो (केए 29-5816) वाहनातून आले. पोलिस असून सदर बझार पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, टेकचंद तोलानी यांनी मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू केला.

विवाहित महिलेची आत्महत्या
दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथील संगीता बसवराज पात्रे (वय 20) या महिलेने गावाजवळील एका विहिरीत आत्महत्या केली. काल रविवार रात्री घरगुती कारणावरून रागाच्या भरात पाटील यांच्या विहिरीत उडी मारली. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता, नेमकी घटना काय घटना घडली याचा तपास सुरू असल्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांनी सांगितले.