आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Arrested For He Doing One Lady Mantel Torhar

मोबाइलवरून छेड, महिन्यांची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विवाहितेला वारंवार मोबाइल करून छेड काढणाऱ्या तरुणास न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. दहिटणे येथील महिलेला पुणे येथे राहणाऱ्या प्रमोद

तारासिंग रजपूत (वय २९) याने २१ जुलै २०१२ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अश्लील संवाद करत त्रास दिला होता.

तुझ्यावर प्रेम असल्याचे तुझ्या नवऱ्याला खोटे सांगून तुझा संसार मोडेन. माझ्यासोबत पळून चल असे म्हणाला. महिलेने जोडभावी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदली होती.

यावरून पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायाधीश पी. व्ही. हिंगणे यांनी आरोपीस शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून अॅड. एस. डी. वरपे यांनी काम पाहिले.