आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Youth Committed Suicide In Case Of Opposing Love Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम डायरी: प्रेम विवाहास विरोध केल्याने तरुणाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरातीलथोबडेवस्ती देगाव नाका परिसरात राहणा-या तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध जुळले. दोघेजण लग्नाच्या बेडीत अडकले. पण हे तरुणीच्या पित्याला मान्य नव्हते. तिला तरुणाच्या ताब्यातून सोलापुरात आणले. तिला नांदवण्यासाठी पाठविण्याची विनंती तरुणाने केली. परंतु वडिलांनी विरोध केल्याने तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोलापुरातील थोबडेवस्ती देगाव नाका परिसरात घडली आहे. अजय राजू गावडे (वय २३, रा. देगाव नाका) याचा २८ जानेवारी रोजी मृत्यू झाला. जानेवारी रोजी त्याने विष प्राशन केले होते. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. अजयची आजी अंबूबाई गावडे (वय ७५) यांनी सलगरवस्ती पोलिसात फिर्याद दिली आहे.

मंगळवारपेठेत चोरी
पश्चिममंगळवार पेठेत राहणारे बसवराज बिराजदार यांच्या घरात चोरी झाली. १० हजार रुपये दोन तोळे चांदीची मूर्ती चोरीस गेली आहे. जोडभावी पोलिसांत ३१ जानेवारी रोजी फिर्याद देण्यात आली आहे. महांतेश माळगे त्याच्या मित्राविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. बिराजदार यांच्या घराची चावी मित्र चंद्रकांत यादवाड यांच्याकडून घेऊन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

४०हजारांची घरफोडी
बापूजीनगरमधीलस्लाटर हाउसमध्ये राहणारे आशाबी बागवान यांच्या घरात चोरी झाली. पाच ग्रॅमचे दागिने, साडेपाच तोळे चांदीचे पैंजण, १० हजार रुपये असा ऐवज चोरीस गेला आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सदर बझार पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. दरवाजा उचकटून चोराने घरातील साहित्य नेले आहे.

अपघातातपादचारी ठार
विजापूररस्ता रेल्वे पुलाजवळ (संभाजी तलावाजवळ) ट्रकच्या धडकेत अनोळखी तरुण (वय ४०) जागीच मृत्यू पावला. हा अपघात रविवारी दुपारी तीनच्या सुमाराला घडला. अपघात इतका भयानक होता की मृत तरुणाच्या चेह-याचा चेंदामेंदा झाला होता. ट्रक (एमएच २० सीसीटी ४९०७) च्या चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. राजू हडपद यांनी यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर सुमारे अर्धातास वाहतूक खोळंबा झाला होता. रात्री अकरापर्यंत मृताची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मारहाण,पैसे हिसकावले
बागवानमश्जिदजवळून दुचाकीवरून जाताना संतोष तळभंडारे (वय ३०, रा. धाकटा राजवाडा, सोलापूर) यांना मारहाण करून साडेतेरा हजार रुपये काढून घेण्यात आले. २० डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता. त्यांना मारहाण झाल्यामुळे ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे फेब्रुवारी रोजी जोडभावी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.