आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवाजी’ आणि ‘वालचंद’मध्ये रस्सीखेच; आज बक्षिसांची लयलूट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमंगल महोत्सवनगरी- सोलापूर युवा महोत्सवातील दहापैकी सहा महोत्सवात विजेते ठरलेला, दबदबा राखणारा, ‘शिवाजी द बॉस’ असे बिरुद असलेल्या बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाच्या संघाला वालचंद महाविद्यालयाकडून यंदा धक्का बसणार आहे की ‘शिवाजी’च पुन्हा ‘बॉस’ ठरेल, ही उत्सुकता दाटलेली दिसून आली.

वडाळा येथे लोकमंगल नगरीत गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या 32 कलाप्रकारांचे सादरीकरण सोमवारपर्यंत पूर्ण झाले. मंगळवारी शोभायात्रेने व नंतर पारितोषिक वितरणाने या चार दिवस चाललेल्या युवा महोत्सवाचा समारोप होणार आहे. वालचंद, शिवाजी, लोकमंगल जैवतंत्रज्ञान, शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, एलबीपीएम, बुर्ला, शिवाजी रात्र, बी. पी. सुलाखे, सी. बी. खेडगीज, संगमेश्वर, शिवदारे, वसुंधरासह सर्वच महाविद्यालयांचे सादरीकरण ठाशीव झाले. यातील कोणते संघ चॅम्पियनशिपच्या स्पध्रेत कितव्या स्थानी असतील हे उद्याच्या निकालातूनच दिसून येईल.

यंदा बहुतांश स्पर्धांमध्ये वालचंद, शिवाजी, संगमेश्वर, शिवाजी रात्र, वसुंधरा, बुर्ला, एलबीपीएम, लोकमंगल जैव तंत्रज्ञान यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली. आजच्या निकालातून शिवाजी महाविद्यालय बार्शीचा संघ आपले अढळस्थान टिकवतो की गमावतो याकडे जसे लक्ष लागले आहे, तसे सतत दुसर्‍या स्थानावर असलेले वालचंद महाविद्यालय यंदा जोरदार मुसंडी मारून चॅम्पियनशिप पटकावण्यात यशस्वी होतो का, हे मंगळवारी निश्चित होईल.