आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगवंतनगरीत रंगणार आजपासून युवकांचा जल्लोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- युवामहोत्सवाचा सरावाचा ज्वर टिपेला पोचला असून रवविारपासून बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात सुरू होणाऱ्या युवा महोत्सवात प्रत्यक्ष सादरीकरण होणार आहे. यासाठी सुमारे ६५ महाविद्यालये सज्ज झाली आहेत.

रवविारी सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. यानंतर मूकनाट्यांनी स्पर्धांना प्रारंभ होईल. पहिल्या दविशी समूहगीत, कातरकाम, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, भित्तीचित्र, लघुनािटका रांगोळी या स्पर्धा होतील.
"लभा'ची तयारी ...सोलापुरातील लक्ष्मीबाईभाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचा संघ यंदा सोळा कला प्रकारात सहभाग घेणार आहे. संघाची रंगीत तालीम शनिवारी झाली. कला प्रकाराचे संयोजन निशिगंधा कापरे विद्यापीठ प्रतिनिधी दीपाली भोसले यांनी केले. संघ व्यवस्थापक प्रा. देवराव मुंडे आहेत. यंदा घवघवीत यश मिळेल, अशी आशा विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, उल्का पाटील यांनी व्यक्त केले.
‘शिवाजी’ पुन्हा ठरणार का बॉस ?
गतवर्षीचनव्हे तर यापूर्वीच्या एकूण सात युवा महोत्सवात बार्शीचे शिवाजी महाविद्यालय जनरल चॅिम्पयनशिप विजेते ठरले आहे. यावर्षी तर या संघाला होमपीच लाभले आहे. साहजिकच आठव्या वेळेत जनरल चॅम्पियनशिपवर नाव कोरून ‘शिवाजी’ पुन्हा बॉस ठरेल काय ? याची उत्सुकता असणार आहे. शिवाय वालचंद , अकलूजचे शंकरराव माेहिते, संगमेश्वर, दयानंद, लक्ष्मीबाई भाऊराव, बुर्ला, वसुंधरा, लोकमंगल जैवतंत्रज्ञान आदी महाविद्यालये सर्वसाधारण जेतेपदाच्या शर्यतीत आहेत.
गतवर्षीचा विजेता संघ बार्शीच
गतवर्षीबार्शीचे शिवाजी महाविद्यालय विजेते, वालचंद महाविद्यालय िद्वतीय तर संगमेश्वर महाविद्यालय तृतीय स्थानावर होते. यंदा या क्रमवारीत निश्चित बदल झालेला दिसून येईल. हीच उत्सुकता असणार आहे. अर्थात हारजित महत्त्वाची नाही, सादरीकरण महत्त्वाचे आहे, असे प्रत्येक संघ सांगतो. पण सादरीकरणाची स्पर्धा ही विजेतेपदासाठीच असते, हेही प्रत्येक सहभागी महाविद्यालयाचे लक्ष्य असते. हे लक्ष्य नेमके कोणते महाविद्यालय भेदते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.

युवा महोत्सव उद््घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार असतील. उद््घाटन महावितरणचे मुख्य अभियंता डॉ . मुरहरी केळे यांच्या हस्ते होईल. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सर्जेराव ठोंबरे, प्राचार्य डॉ. मधुकर फरतडे, बीसीयूडी संचालक डॉ. भीमाशंकर भांजे, कुलसचवि शिवशरण माळी, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, विद्यार्थी मंडळ संचालक प्रा. प्रशांत नलवडे, विद्यार्थी मंडळ अध्यक्ष सचिव यांच्यासह शिवाजी महाविद्यालय युवा महोत्सव संयोजन समितीचे पदाधिकारी, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.