आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब विद्यार्थ्यांसाठी पुढे आला तरुणांमधील ‘स्पार्क’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘टाइम फॉर सोसायटी’ हे ब्रीद घेऊन पूर्वभागातील उच्च शिक्षित युवकांनी ‘स्पार्क’ नावाची संघटना स्थापन केली. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देणे, रोजगारासाठी मदत करणे या उद्देशाने ही संघटना सुरू केल्याचे अध्यक्ष गणेश पेरला यांनी सांगितले.

संघटनेचे सर्वच सदस्य संगणक, माहिती व तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी आणि स्थापत्य आदी शाखांतील पदवीधर आहेत. पुणे, बंगळुरू, हैदराबाद येथील कार्पाेरेट कंपन्यांमध्ये ते सेवा बजावतात. महिन्यातील दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी हे तरुण सोलापूरला येतात. सदस्यांच्या घरीच बैठका घेतात. त्यानंतर प्रत्येकी दीडशे रुपये संघटनेसाठी जमा करतात. त्यातून विद्यार्थ्यांना मदत सुरू केल्याचे सचिव व्यंकटेश बोद्धूल म्हणाले. संघटनेची स्थापना केल्यानंतर त्यांनी कुंभारीतील गोदूताई परुळेकरनगर परिसरातल्या विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांच्या वह्या दिल्या. पुढील काळात असे कोणते उपक्रम हाती घेता येतील याचे नियोजन सुरू असल्याची माहितीही र्शी. बोद्धूल यांनी दिली.

नव्याने उभारणी
सहकार तत्त्वावर पूर्वभागात जे काही उभे राहिले होते, ते आता पूर्णपणे कोसळले. त्याचा कुठलाच परिणाम कष्टकर्‍यांवर झालेला नाही. विडी कामगारांनी कुटुंबे सावरली. मुलांना शिकवले. त्याच बळावर आम्ही शिकलो. आता दुसर्‍यांना शिकवायचे आहे.’’ व्यंकटेश बोद्धूल, सचिव, स्पार्क संघटना

शिक्षणातूनच प्रगती
समाजाची प्रगती त्या समाजातील शिक्षणाच्या प्रमाणावर अवलंबून असते. शहराच्या पूर्वभागातील कष्टकर्‍यांची मुले खूप हुशार आहेत; परंतु आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने त्यांना उच्च् शिक्षण घेता येत नाही. त्यांना केवळ मार्गदर्शनाची गरज आहे.’’ गणेश पेरला, अध्यक्ष, स्पार्क संघटना