आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म. युसूफ शेख यांचा जांभेकर पत्रकारिता पुरस्काराने गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘दिव्यमराठी’च्या सोलापूर आवृत्तीतील पत्रकार म. युसूफ शेख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०१२ चा "बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार' देऊन मुंबईत सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रुपये, सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणा-यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी गौरव केला जातो.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात फेब्रुवारी रोजी सायंकाळी हा सोहळा पार पडला. व्यासपीठावर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, माहिती जनसंपर्क विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने समारंभाला सुरुवात झाली. सोहळ्यास पुरस्कार निवड समितीचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच पुरस्कारार्थी पत्रकारांचे कुटुंबीय उपस्थित होते. संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्वीकारताना म. युसूफ शेख. यावेळी गिरीश बापट, जनसंपर्क विभाग सचिव मनीषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक.