आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झपाटलेला’च्या रूपाने येणार मराठी सिनेमातील पहिला थ्रीडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘तात्या विंचू’, नुसत्या नावानेच भल्याभल्यांच्या छातीत धडकी भरविणारा, लहानांपासून-मोठय़ांपर्यंत सर्वांचा थरकाप उडविणारा असा हा दृष्ट खलनायक. या तात्या विंचूने नव्वदच्या दशकात मराठी रूपेरी पडद्यावर आणि प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ‘झपाटलेला’ या महेश कोठारे यांच्या कल्पक दिग्दर्शनातून साकारलेल्या चित्रपटातला तात्या विंचू हा बाहुला आजही मराठी प्रेक्षकांमध्ये तेवढाच लोकप्रिय आहे. याच चित्रपटाचा थ्रीडी आणि परदेशी तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेला दुसरा भाग सात जूनला प्रदर्शित होत आहे. ‘ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा’ असा विचित्र मृत्युंजय मंत्र म्हणत तात्या विंचूने मृत्यूवरही विजय मिळविला होता. बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणार्‍या लक्ष्याच्या आयुष्यात धुमाकूळ घालणार्‍या चित्रपटाचा दुसरा भाग थ्रीडी प्रकारात येत आहे.

मराठीतील पहिला थ्रीडी

दिग्दर्शक महेश कोठारे यांचा महत्त्वाकांक्षी झपाटलेला 2 हा मराठीतील पहिलाच थ्रीडी आणि सिक्वल आहे. व्हायकॉम 18 च्या बॉम्बे टॉकीज चित्रपटासोबत झपाटलेला 2 चा फस्र्ट लुक संपूर्ण भारतातील चित्रपटगृहात पाहावयास मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती व्हायकॉम 18 आणि मूव्हिंग पिक्चर्स प्रस्तुत तर कोठारे अँण्ड कोठारे व्हीजन निर्मिती संस्थेव्दारे करण्यात आली आहे. थ्रीडी कॅमेरे, परदेशी तंत्र आणि स्पेनच्या एनरीक क्रिआडो यांच्या तंत्रज्ञानाखाली हा चित्रपट निर्माण झाला आहे.

यांची अदाकारी आणि कलाकारी

शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांच्या साहाय्याने तात्याचा नवा लुक आहे. आदिनाथ कोठारे, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, मधु कांबीकर, सई ताम्हणकर, सुनील तावडे व दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिका आहेत. पोलिस कमिशनरच्या भूमिकेत महेश कोठारे आहेत. गुरू ठाकूर यांची गीते तर अवधूत गुप्ते यांचे संगीत आहे. प्रॉडक्शन डिझाइन नितीन देसाई यांचे आहे.

बिग बजेट पहिला थ्रीडी चित्रपट
भारतीय सिनेमाच्या शतकोत्तरी वाटचालीनिमित्त याची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या भागाने हाऊसफुल्ल, गोल्डन ज्युबिली, सिल्व्हर ज्युबिली असे रेकॉर्ड केले होते. तसेच हा देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा बाळगतो.’’ महेश कोठारे, चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक