आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक शिक्षक संघाकडून शिक्षकदिनाचा बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या विविध मागण्यांची प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी न केल्यास शिक्षकदिनावर (5 सप्टेंबर) संघाच्या वतीने बहिष्कार घातला जाईल, असा इशारा अध्यक्ष म. ज. मोरे यांनी दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक महत्त्वाचे व जिव्हाळ्याचे प्रo्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी जिल्हा संघाच्या वतीने अनेक वेळा लेखी निवेदन, चर्चा केली, धरणे आंदोलन केले, तरीही मागण्या पूर्ण केल्या नाहीत. नवीन आलेले शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांनी पाच ते सहा महिन्यांमध्ये सर्व प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रo्न निकाली काढू, असे आश्वासन देऊन केवळ वेळ मारून नेली, म्हणून शिक्षक संघाने शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस बब्रुवान काशीद, कोषाध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, संजय सावंत, संजय चेळेकर, किरण कुंभार, संजय सरडे, नागनाथ साठे, गणेश खांडेकर, अप्पासाहेब चौगुले, चंद्रकांत जाधव, एकनाथ भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या आहेत संघाच्या मागण्या
14 अट्रेंडे शिक्षकांना नियमित करावे.
सेवकांस नियमित वेतनर्शेणीमध्ये सामावून घ्यावे
निवडर्शेणीचा लाभ जिल्ह्यातील शिक्षकांना द्यावा
अंशदायी पेन्शन योजनेचे खाते उघडावे
अतिउत्कृष्ट कामाची जादा वेतनवाढ द्यावी
मुख्याध्यापक व पदवीधर यांची पदोन्नती करावी
सुट्यामध्ये महापालिका व शिक्षण विभागातील विषमता दूर करावी
भविष्यनिर्वाह निधीची रक्कम समारंभ व शिक्षणासाठी वेळेवर द्यावी
प्राथमिक शिक्षकांना सेवेत कायम करणे