अकोल्याजवळ ट्रक आणि / अकोल्याजवळ ट्रक आणि इंडिका कारचा भीषण अपघात; तीन ठार

Agency

Jun 10,2011 10:01:00 AM IST

अकोला: शहरापासून जवळच असलेल्या शिवणी विमानतळाजवळ ट्रक आणि इंडिका कारच्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री हा अपघात झाला. ट्रक चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेली माहिती अशी की, अमरावतीकडून अकोल्याकडे येणारी इंडिका कार अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जाणा-या ट्रकला समोरुन धडकली. त्यात इंडिका चक्काचूर झाली. तीन मृतांपैकी एकाची ओळख पटली असून दोन जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. अविनाश काजे असे तीन मृतांपैकी एकाचे नाव आहे.

X
COMMENT