नागपूर-जबलपूर महामार्गावरील ट्रक / नागपूर-जबलपूर महामार्गावरील ट्रक अपघातात पाच ठार

Agency

Jun 09,2011 11:30:18 AM IST

नागपूर: नागपूर- जबलपूर महामार्गावरील देवलापूर येथे बुधवारी रात्री झालेल्या ट्रकच्या विचित्र अपघाताच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. रामराजे सलामे व त्यांची पत्नी वच्छलाबाई यांचा मृतामध्ये समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सलामे दाम्पत्य बाजार आटोपून सायकलवरून घरी जात असताना भरधाव वेगात येणाºया एका ट्रकने सायकलीला जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. ट्रकमधील गणेश कुमरे, सतीश पेंदाम, नरेंद्र नराटी या तिघांचाही त्यात मृत्यू झाला.X
COMMENT