आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अकोल्यात ‘रुग्ण’च उतरले रस्त्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला -पश्चिम विदर्भातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या अकोला जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. येथील गैरसोयींकडे वारंवार लक्ष वेधूनही त्यात सुधारणा होत नसल्याने अखेर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी रुग्णाचा वेश परिधान करून मोर्चा काढला. हाताला प्लास्टर केलेले, व्हीलचेअर व स्ट्रेचरवर बसलेले कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
पश्चिम विदर्भातील यवतमाळनंतर सर्वात मोठे रुग्णालय म्हणून अकोला जिल्हा रुग्णालयाची ओळख आहे. या ठिकाणी अकोल्यासह वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. मात्र, या रुग्णालयात अनेक दिवसांपासून अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एक्स-रे व सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. या गैरसोयी दूर करण्यासाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा संबंधित अधिकाºयांकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला होता. मात्र, तरीही आरोग्य यंत्रणेने या गैरसोयी दूर केल्या नाहीत. अखेर या समस्यांकडे आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्यासाठी भाजयुमोचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अनोखे आंदोलन केले. या वेळी काढण्यात आलेल्या मोर्चात भाजयुमोर्चे कार्यकर्ते रुग्णांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. हाताला प्लास्टर, डोक्याला पट्टी, व्हीलचेअरवर बँडेज बांधलेले, तर काही कार्यकर्ते चक्क रुग्णांच्या वेशात स्ट्रेचरवर झोपून मोर्चात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

0