अमरावतीमध्ये कृषी विभागाच्या / अमरावतीमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई; खताच्या 411 गोण्या जप्त

Divyamarathi Team

Jun 10,2011 01:42:25 PM IST

अमरावती: येथील एकता इंटरप्राईझेसवर अमरावती कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. या कारवाईत खताच्या 411 गोण्या जप्त करण्यात आल्या. खत परराज्यातून आणण्यात आले होते. त्याची जादा दराने विक्री सुरु असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती.
कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या आदेशामुळे राज्यभरात कृषी विभागाकडून ठिकठिकाणी छापे टाकले जात असल्याने अवैध बियाणे आणि खते विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

X
COMMENT