घोरपडीची तस्करी करणाऱ्या / घोरपडीची तस्करी करणाऱ्या चौघांना अमरावतीत अटक

Jun 28,2011 05:16:34 AM IST

अमरावती - घोरपडींची तस्करी करणाऱ्या चौघांना बडनेरा मार्गावरील सातुर्णा परिसरात सोमवारी पोलिसांनी अटक केली. शेल्या पवार, नंदूसिंग भोसले, दिलीप भोसले, राजकुमार पवार अशी आरोपींची नावे आहेत. वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत पीपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा गैरप्रकार उघडकीस आला. पंधरा दिवसांपूर्वी वनविभागाच्या शेड्यूल्ड वनामध्ये येणाऱ्या कासवांची तस्करी करणाऱ्यांनाही वन्यजीव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले होते. दरम्यान, न्यायालयाने या चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

X