Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | anna hazare is the saport of baba ramdev, lokpal bill, anti-corruption movement

रामदेवबाबांच्या भ्रष्टाचारविरोधी उपोषणाला अण्णांचा पाठिंबा

agency | Update - Jun 02, 2011, 12:39 PM IST

भ्रष्टाचारविरोधात येत्या 4 जूनपासून उपोषणाला बसणार असलेल्या योगाचार्य रामदेव बाबांना आपला पाठिंबा असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज (गुरुवारी) सांगितले. भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्यांमध्ये एकमत नसल्याने केंद्र सरकार त्याचा फायदा घेत नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोपही अण्णांनी केला.

  • anna hazare is the saport  of  baba ramdev,   lokpal bill,   anti-corruption movement

    राळेगणसिध्दी: भ्रष्टाचारविरोधात येत्या 4 जूनपासून उपोषणाला बसणार असलेल्या योगाचार्य रामदेव बाबांना आपला पाठिंबा असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज (गुरुवारी) सांगितले. भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्यांमध्ये एकमत नसल्याने केंद्र सरकार त्याचा फायदा घेत नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोपही अण्णांनी केला.
    रामदेव बाबा देशाच्या हितासाठी उपोषण करणार आहे. त्यामुळे त्यांना आपला पूर्ण पाठिंबा आहे. देशातील भ्रष्टाचाराचा नायनाट करणाची सरकारची इच्छा दिसत नसल्याचे मसूदा समितीच्या बैठकीत दिसून आले होते. आम्ही 5 जूनला रामदेव बाबांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. रामदेव बाबांच्या आंदोलनालाही जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असेही अण्णा म्हणाले.


Trending