कुख्यात गुन्हेगार राहुल / कुख्यात गुन्हेगार राहुल मेश्रामवर सशस्त्र हल्ला

Jun 17,2011 06:33:49 PM IST

नागपूर - कुख्यात गुन्हेगार राहुल मेश्रामवर गुरवारी हिवरेनगर भागात सशस्त्र हल्ला करण्यात आला. राहुलला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुल मेश्रामवर या आधीही खून, चोरी, मारामारी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज हाडगेच्या मित्राच्या खुनामध्ये राहुल मेश्रामचे नाव समोर आले होते, असे सांगण्यात येत आहे कि मनोजनेच बदला घेण्यासाठी राहुल मेश्रामवर हल्ला केला असावा. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची चौकशी चालू आहे.X