आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने कल्याण रेल्वेस्थानक हादरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण: सीएसटीकडे जाणार्या लोकलमधील महिलांच्या डब्यात बॉम्ब ठेवला असल्याच्या अफवेने कल्याण रेल्वे स्थानक मंगळवारी हादरले.
लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्लॉटफार्म क्र. दोनवरुन सीएसटीकडे जाणा-या लोकलमधील महिलांच्या डब्यात बॉम्ब असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळाली.
पोलीस आयुक्त पी. आय. सरदार यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप, पाच अधिकारी आणि 50 पोलीस शिपाई, लोहमार्ग
दलाचे अधिकारी, डॉग स्क्वॉडने रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली. सर्व फलाटावरील सगळ्या गाड्या रिकाम्या करण्यात आल्या. तब्बल तीन तास स्थानकाची तपासणी करण्यात आली परंतु काहीच निष्पन्न झाले नाही. पोलिसांना खोटी माहिती देणा-याच्या मोबाइल क्रमांकाची चाचपणी सुरु असून त्याचा लवकरच शोध घेतला जाईल, असे पोलीसांनी सांगितले.