बहिणीच्या घरासमोरच भावाने / बहिणीच्या घरासमोरच भावाने घेतले जाळून

Jun 29,2011 02:07:08 PM IST

नागपुर - बहिणीच्या घरासमोर एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेतल्याची घटना सोमवारी रात्री शहरातील श्याम विलास नगरमध्ये घडली. मृतकाचे नाव विलास वंजारी(वय ४०) असे आहे. सोमवारी विलास त्याच्या बहिणीच्या घरी विलासनगर मध्ये तीला भेटायला गेला होता. विलासने तेथे चहा-नाष्टा पण केला. परत निघताना विलासने आपले कपड्याची पिशवी तेथेच ठेवली आणि दोन तीन दिवसांनी पिशवी घेऊन जातो असे सांगून तेथून निघून गेला. १०-१५ मिनिटा नंतर विलासने तेथीलच एका रिकाम्या प्लॉटमध्ये स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेतले. विलासला असे जळताना पाहून तेथील लोक बघतच राहिले. काही लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर अवस्थेत त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार चालू असतान मंगळवारी रात्री त्याचे निधन झाले. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास चालू आहे.

X