सायबर क्राइमचा शोध / सायबर क्राइमचा शोध घेण्याचे बुलडाणा पोलिसांसमोर आव्हान

Jun 19,2011 05:01:14 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी सर्वांत मोठा सायबर क्राइमचा गुन्हा दाखल झाला असून, इंटरनेटच्या माध्यमातून आरोपीने काय काय गुन्हे केले आहेत याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे.

युवतीसोबत केलेल्या शारीरिक संबंधाची ब्लु फिल्म वेबसाइटवर अपलोड केल्याने सध्या पोलिस कोठडीत असलेल्या संतोष ऊर्फ सोन्या डोंगरदिवे याने कोणाकोणाला मेलद्वारे ही फिल्म पाठविली होती, त्याची माहिती पोलिसांनी मिळवणे सुरू केले आहे. पोलिसांनी मेल ऍड्रेस मिळवले असून त्या माध्यमातून सोन्याच्या मित्रांपर्यंत व इंटरनेटवर फिल्म अपलोड करणा-यापर्यंत पोचण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.

लाल पोलिस लाइनमध्ये राहणा-या संतोष ऊर्फ सोन्याने केलेल्या कृष्णकृत्यामुळे खळबळ उडाली असून युवतीच्या फिर्यादीनंतर तो पोलिस कोठडीत दिवस काढतो आहे. सोमवारपर्यंत त्याला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. पोलिस या प्रकरणात सखोल चौकशी करीत असून संतोषचा लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे. फेसबुकवरील मित्रांना त्याने मेलद्वारे आपले कृष्णकृत्य पाठविले होते. मात्र त्याच्या मित्राने हे सर्व युनिव्हर्सल केल्याने सोन्या अडकला.
त्याच्या किती मित्रांना व कोणत्या मेल ऍड्रेसवरून ही चित्रफीत फिरत राहिली, याचा तपास पोलिस घेत आहेत. बुलडाण्यासारख्या शहरात सायबर क्राइमची एवढी मोठी घटना पहिल्यांदाच घडली. त्यामुळे याचा तपास करताना पोलिसांना अनेक बारीक-सारीक गोष्टींची नोंद घ्यावी लागते आहे.
हे प्रकरण पुढे काय वळण घेते, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

X