प्रशासनाचा हलगर्जीपणा, शेकडो / प्रशासनाचा हलगर्जीपणा, शेकडो पोती गहु भिजला पावसात

वृत्तसंस्था

Jun 26,2011 11:44:15 AM IST

चंद्रपूर - शहरात शनिवार रोजी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे रेशनवर विक्रीसाठी आलेला शेकडो पोती गहू पावसात भिजला. शुक्रवारी सायंकाळी 51 हजार पोती गहू येथील रेल्वेस्थानकावर पोचला. मात्र, त्यावेळी पाऊस नव्हता. शनिवार सकाळपासून शहरात रिमझिम पाऊसाने सुरुवात केली, याचा फटका रेल्वे सायडिंगवरील गव्हांच्या पोत्यांना बसला. पाऊस सुरू झाल्यानंतर घाईघाईने गहू गोडाऊनमध्ये हलविण्याची कारवाई सुरू झाली. मात्र, तोपर्यंत शेकडो पोती ओली झाली होती. रात्री उशिरापर्यंत गव्हाची पोती गोडाऊनमध्ये हलविण्याचे काम सुरू होते. गहू गोडाऊनमध्ये पोचला तरीही काही पोती ओली झाल्याने गहू सडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

X
COMMENT