पाणी ना कोळसा, / पाणी ना कोळसा, वीज येईल कशी?

divya marathi team

Jun 02,2011 03:20:02 AM IST

नागपूर - यवतमाळमध्ये नुकत्याच झालेल्या पाणी परिषदेत विदर्भांवर लादल्या जाणार्‍या वीज प्रकल्पांबाबत नवा वाद सुरू झाला, मुख्यमंत्र्यांनीही या प्रकल्पांबाबत आश्चर्य व्यक्त केले. विदर्भात एकूण 89 वीज प्रकल्पांना राज्य सरकारने मंजुरी दिली असली, तरी वीज उत्पादनांसाठी या भागात ना मुबलक पाणी आहे ना कोळशांसारखी साधने. मग अशा स्थितीत विदर्भात 55 हजार मेगावॅट वीज उत्पादन करणे कसे शक्य आहे? इतकेच नव्हे, तर हे प्रकल्प विदर्भांसाठी वरदान नव्हे तर संकटच निर्माण करतील, अशीही स्थानिक लोकांमध्ये भीती आहे. त्यामुळे विलास मुत्तेमवार यांच्यासारख्या ज्येष्ठ कॉँग्रेसच्या नेत्यांनी या प्रo्नावरून मुख्यमंत्र्यांना ‘घरचा आहेर’ दिला होता.

मुख्यमंत्री म्हणाले होते..
राज्यात 5 हजार मेगावॅट विजेची कमतरता आहे. तरीही एकट्या विदर्भात 45 हजार मेगावॅट वीज उत्पादनाला मंजुरी कशी काय देण्यात आली?
मुख्यमंत्री आता पाणी परिषदेचे महत्त्व पटवून देऊ लागले आहेत, परंतु विदर्भात पाणी राहिलंय कुठे? नदीमधील सर्व पाणी तर वीज प्रकल्पांसाठी देण्यात आले आहे.
- स्वानंदी सोनी, वन्य जीव अभ्यासक

X
COMMENT