Home | Maharashtra | Kokan | Thane | dog issue in thane

ठाणेकरांनी घेतला भटक्या श्वानांचा धसका

प्रतिनिधी | Update - Jun 12, 2011, 04:14 PM IST

कुत्र्याच्या टोळक्याने एका चार वर्षीय बालकावर हल्ला केल्याची घटना कळवा येथे घडल्याने ठाणेकरांनी भटक्या श्वानांचा धसका घेतला आहे.

  • dog issue in thane

    कुत्र्याच्या टोळक्याने एका चार वर्षीय बालकावर हल्ला केल्याची घटना कळवा येथे घडल्याने ठाणेकरांनी भटक्या श्वानांचा धसका घेतला आहे. कुत्र्यांचा हा हैदोस थांबवण्यात ठाणे महापालिका प्रशासनही पूर्णपणे अपयशी ठरले असून, गेल्या पाच वर्षात शहरातील कुत्र्यांनी 33 हजार 882 जणांना चावा घेतल्याचे उघड झाल्याने ‘भीक नको, कुत्रे आवरा’ असा संतप्त सूर आळवण्याची पाळी शहरवासीयांवर आली आहे. ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. त्यामुळे रात्री उशिरा मोटारसायकलने घरी परतणा-यांची घाबरगुंडी उडत आहे.

Trending