२७ जूनपासून डीटीएड / २७ जूनपासून डीटीएड प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत

Jun 22,2011 06:20:33 PM IST

नागपूर । बारावी परीक्षेचा निकाल लागल्यापासून डीटीएड प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहणा-या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्टÑ राज्य शिक्षण संशोधन परिषदेतर्फे २७ जूनपासून ही प्रवेश प्रकिया सुरू केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिषदेचे संचालक डॉ. श्रीधर साळुंके यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाºयांची बैठक गुरुवारी बोलावली असून, त्यात प्रवेश अर्जांची छपाई व अधिकारी-कर्मचा-यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. त्यानंतर प्रवेशाची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दरवर्षी बारावीचा निकाल लागताच दुस-याच दिवशीपासून डीटीएडची प्रवेश प्रक्रिया सुरू होते; मात्र यंदा आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठीचा महाराष्टÑ नॉलेज कॉर्पोरेशन व शिक्षण विभागातील करार संपुष्टात आल्यामुळे १५ जूनपासून सुरू होणारी ही प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तिष्ठत बसावे लागले होते.

X