पाच हजार कोटींचा / पाच हजार कोटींचा ऊर्जा प्रकल्प नागपुरात उभारणार

प्रतिनिधी

Jun 09,2011 02:18:46 AM IST

नागपूर- एनटीपीसी अंतर्गत पाच हजार सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करून नागपूरमध्ये ५०० मेगावॅट क्षमतेचे २ ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. ५,७०० कोटींचे ५०० मेगावॅट क्षमतेचे २ ऊर्जा प्रकल्प पहिल्या टप्प्यात मार्च २०१२ मध्ये आणि ८,५०० कोटींचे ६६०- मेगावॅट क्षमतेचे २ ऊर्जा प्रकल्प दुस-या टप्प्यात सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित होतील, असेही मोघे यांनी या वेळी सांगितले. मौडा ऊर्जा प्रकल्प २०१२ पर्यंत उभारण्यात येणा-या प्रकल्पासाठी लागणा-या शेतक-यांच्या जमिनीला प्रतिहेक्टर १० रुपये दिल्याचेही मोघे यांनी सांगितले.

X