आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

डबक्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- जिल्ह्यातील साखरखेडा येथे सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने आजूबाजूच्या शेततळयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यात डु्रंबण्याची हौस पूर्ण करण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दरम्यान, त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलाचे प्राण वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे.

शेख नवेद शेख गफार (वय 11), शेख अक्रम शेख तस्लिम (वय 12), शेख सलमान शेख अय्युब व शेख वसीम शेख कय्युम यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सोमवारी रात्री बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. साखरखेडा परिसरातील रतन तलावाच्या जवळपासच्या परिसरात खड्डयामध्ये पावसाचे पाणी मोेठ्या प्रमाणात साचले होते. या साचलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह नाईकवाडी भागातील पाच मुलांना आवरता आला नाही. त्यांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास या पाण्यात उड्या मारल्या. मात्र, खड्डयात मोठ्या प्रमाणात चिखल आणि गाळ जमा झाल्याने पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा या खड्यात फसून मृत्यू झाला. तर पाचव्या मुलाला वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले. शाहरूख दस्तगीर असे वाचविण्यात आलेल्या मुलाचे नाव असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

0