पोलिसांचा खब-या असल्याच्या / पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयावरून नक्षलींकडून हत्या

Jun 27,2011 02:11:38 AM IST

गडचिरोली: जिल्ह्यातील उदगली येथील श्रीकांत अंताराम तेलंगे (वय ३२) यांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री जयसिंगटोला येथे घडली. पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयावरून श्रीकांत तेलंगे यांचे नक्षलवाद्यांनी चार दिवसांपूर्वीच त्यांच्या राहत्या घरून अपहरण केले होते. तसेच गावातील अन्य दोघांचेही अपहरण केले होते, मात्र त्यांची नंतर सुटका करण्यात आली. श्रीकांतला मात्र त्यांनी आपल्या सोबतच ठेवले होते. दरम्यान, शनिवारी श्रीकांत तेलंगे यांना ठार करून त्यांचा मृतदेह चौरस्त्यावर आणून टाकला.

X