चार वर्षीय मुलाचा / चार वर्षीय मुलाचा खेळतांना विहीरत पडून मृत्यू

वृत्तसंस्था

Jun 25,2011 06:28:39 PM IST

गडचिरोली - अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथे अंगणातील विहीत चार वर्षीय मुलगा पडून त्याचा मृत्यू झाला आहे. मरपल्ली येथील आट्टोला यांच्या घरासमोरील अंगणात खेळत असताना अचानक हिमेश जनार्दन आट्टोला हा चार वर्षीय मुलगा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजता घडली.

अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथे जनार्दन आट्टोला यांचा चार वर्षीय मुलगा हिमेश अंगणात खेळत होता. कुणाचे लक्ष नसताना तो अचानक विहिरीत पडला. हिमेशचा आवाज ऐकल्यानंतर वडील जनार्दन यांनी त्याला बाहेर काढून त्याला जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना हिमेशचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास स्थानिक पोलिस करत आहेत.

X
COMMENT