आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधी खर्चुनही दलितवस्ती बकाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - जिल्ह्यातील दलितवस्ती सुधार योजनेच्या कामांकडे अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे दोन कोटी ३५ लाख रुपये पाण्यात गेल्याचे समोर आले आहे. स्वच्छता आणि आरोग्याच्या हेतूने शासनाने दलितवस्ती सुधार योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत यंदा दोन कोटी 35 लाख रुपयांची कामे करण्यात आली. मात्र या कामावर अधिका-यांचे नियंत्रण नसल्याने अनेक गावांत काम होऊनही दलितवस्त्यांमधील बकालपणा कमी झालेला नाही.

यासंदर्भात समाजकल्याण विभागाकडे चौकशी केली असता, 'आमच्या विभागामार्फत नियमीत कामाची पाहणी केली जाते, तसेच आम्हाला प्रत्येक कामाकडे लक्ष देता येत नसल्याने पंचायत समितीच्या अभियंत्यांने त्या कामांच्या दर्जाकडे लक्ष देणे आपेक्षीत आहे.' असे समाजकल्याण विस्तार अधिकारी आर.के.कोलते यांनी सांगितले आहे. तसेच दलितवस्ती सुधार योजनेतंर्गत केलेल्या कामांच्या तक्रारी अजून आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत. तक्रार आल्यानंतर चौकशी करु असेही ते म्हणाले

दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून कामे सुरु आहे. या कामांचा ठेका मिळविण्यासाठी स्थानिक पातळीवर
विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा असते. जिल्ह्यातील चामोर्शी, सिरोंचा, अहेरी, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा व गडचिरोली या तालुक्‍यांत दलितवस्ती सुधार योजनेतून सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करण्यात आले. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, नियोजनाचा अभाव आणि अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे दलितवस्तीतील कामांचा बोजवारा उडाला आहे. सिमेंट रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. नाल्यांचे काम अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आले आहे. काही गावांमध्ये तर, दलितवस्ती नसतानाही दलित सुधार योजनेतून सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले. मात्र, याकडे दलित नेते, पदाधिका-यांचे लक्ष नसल्याने बिनबोभाटपणे दलितवस्ती सुधार योजनेच्या निधीचा गैरवापर होत आहे.

0