नक्षलवाद्यांकडून गोळ्या झाडून / नक्षलवाद्यांकडून गोळ्या झाडून व्याप-याची हत्या

Jun 25,2011 03:53:49 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील मुरूमगाव येथे नक्षलवाद्यांनी एका बांधकाम कंत्राटदाराची हत्या केली. आज शनिवार रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. रामचंद्र मलय्या बहिरवार (५८) असे मृताचे नाव आहे.

रामचंद्र बहिरवार हे बांधकाम कंत्राटदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी गावातच वेल्डींगचे दुकान सुरू केले होते. शनिवार रोजी दुपारी दोन सशस्त्र नक्षलवाद्यी एका मोटारसायकलने त्यांच्या घरी आले. त्यांनी रामचंद्र बहिरवार यांच्याशी त्यांच्या घरा समोरच त्यांच्याशी बोलायला सुरूवात केली. या बातचीतीदरम्यान नक्षलींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. नक्षलवादी आणि बहिरवार यांच्यात नेमके काय बोलणे सुरु होते आणि त्यांची हत्या का करण्यात आली ? हे अद्याप कळू शकलेले नाही. बहिरवार हे मुरुमगावातील काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे समजते. बहिरवार यांच्या घराजवळच मुरूमगाव पोलिस ठाणे असतांना हा हल्ला झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

X