पोलिसांचा खब-या असल्याच्या / पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या

Jun 26,2011 05:19:31 PM IST

कुरखेडा - धानोरा तालुक्यातील उगदली येथील रहिवासी श्रीकांत अंताराम तेलंगे(३२) या तरुणाची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. तो पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयावरुन त्याची हत्या करण्यात आली.

चार दिवसांपूर्वी गावातील तीन तरुणांचे त्याच्या राहत्या घरातून नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. त्यातील दोघांना सोडून देण्यात आले, तर श्रीकांतची जयसिंगटोला येथे शनिवारी हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह जयसिंगटोला येथील रस्त्यावर टाकून देण्यात आला. त्याच्या खिशात नक्षलवाद्यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समजते. पोलिसांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मालेवाडा पोलिसांनी जयसिंगटोला येथे घटनेचा पंचनामा करुन त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कुरखेडा येथे पाठविण्यात आला. पोलिस पुढील तपास करीत आहे.

X