अल्पवयीन मुलीवर सामूहिक / अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Jun 28,2011 05:09:42 AM IST

नागपूर - घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टेशन परिसरातील रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी बलात्कार केल्याची घटना सीताबर्डी परिसरात घडली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला.

आईसोबत सतत भांडणे होत असल्याने कन्हान येथील १७ वर्षांची मुलगी मामाकडे राहण्यास गेली होती. मामाने तिच्या लग्नाची तयारी सुरू केल्याने ती १९ जूनला घरातून पळून गेली. आपला मित्र राजेशसोबत मुंबईला जाण्याचा तिचा विचार होता, राकेशने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती ऐकत नसल्याचे पाहून राकेशने तिला पन्नास रुपये देऊन तेथून निघून गेला.

या मुलीने स्टेशनवर पाच दिवस काढले. या दरम्यान तिची ओळख ऑटोचालक अज्जू सोबत झाली. तिने अज्जूला सर्व हकीकत सांगितली. अज्जूने तिला आपला मित्र दीपक याच्या घरी नेले. सायंकाळी बाहेर नेण्याच्या बहाण्याने तिला आॅटोमध्ये बसवून एका गोदामात नेले व तिच्यावर बलात्कार केला. तसेच एका हॉटेलात नेऊन दोन मित्रांसह बलात्कार केला.

X