कर्मचा-यांची कमतरता दोन / कर्मचा-यांची कमतरता दोन महिन्यात दूर करणार - मधुकर चव्हाण

Jun 18,2011 05:29:57 PM IST

गोंदिया - नक्षलग्रस्त भागात कर्मचा-यांची जाणवणारी कमतरता आणि त्यामुळे विकासाला बसणारी खीळ ही कोंडी लवकरच फोडण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिली आहे.

राज्यातील मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातील रिक्तपदे भरण्याची कार्यवाही सुरु केली असून, येत्या दोन महिन्यात ही पदे भरली जाणार आहेत. असे चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित आढावा बैठकीत म्हटले आहे. चव्हाण पुढे म्हणाले की, गोंदिया जिल्हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त असल्यामुळे येथील आदिवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी दु्ग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन विकासाच्या विविध योजना अधिका-यांनी राबविल्या पाहिजेत.

आदिवासींना दुधाळ जनावरे उपलब्ध करुन द्यावीत. यासाठी ५० टक्के अनुदानाची योजना तातडीने राबवावी. राष्ट्रीयकृत बँकांनी या योजनेसाठी पुढाकार घेऊन लाभार्थी निवडून त्यांना लवकरात लाभ मिळवून द्यावा.

X