Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | incrochment-billding-colaps

सहाशे अतिक्रमणे नगरला जमीनदोस्त

divya marathi team | Update - Jun 03, 2011, 01:34 AM IST

शहरातील बांधकाम विभाग व महानगरपालिका यांच्या संयुक्त पथकाद्वारे तीन दिवसांपासून राबविण्यात येणा:या मोहिमेत सुमारे दीडशे पक्की बांधकामे व साडेचारशे किरकोळ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

  • incrochment-billding-colaps

    नगर - शहरातील बांधकाम विभाग व महानगरपालिका यांच्या संयुक्त पथकाद्वारे तीन दिवसांपासून राबविण्यात येणा:या मोहिमेत सुमारे दीडशे पक्की बांधकामे व साडेचारशे किरकोळ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
    शहरामध्ये वाहतुकीची कोंडी असते. रस्त्यावरील विक्रेते, दुकाने व चहाच्या टप:यांमुळे वाहतुकीला अडथळे येतात. यावर महापालिकेने कारवाई सुरू केली की, अडथळा आणला जातो. या वेळी मात्र खुद्द पालकमंत्र्यांनीच आदेश दिल्याने अतिक्रमण हटाव कारवाई कोणताही विरोध न होता पार पडली. पालकमंत्र्यांनी नेमकी काय जादू केली याचीच चर्चा आता शहरात सुरू आहे.
    महानगरपालिका प्रशासनाने नियोजन केल्याप्रमाणे आतापर्यंत नगर - औरंगाबाद रस्त्यावरील कोटला परिसर, मनमाड रस्त्यावरील सावेडी परिसर तसेच शहरातील तारकपूर, शिवाजी महाराज, माळीवाडा, गंजबाजार, मोचीगल्ली यारख्या अनेक भागांतील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनंतरचा हा प्रश्न मार्गी लागला आहे.
    यामुळे वाहतुकीचा प्रश्र मार्गी लागण्याची आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Trending