पहिल्या पावसाचा कोकण / पहिल्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका; निवसर स्टेशनचा भराव खचला

Agency

Jun 05,2011 11:15:03 PM IST

रत्नागिरी: कोकणसह राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्या पावसामुळे सर्वदूर गारवा जाणवत असला तरी कोकण रेल्वेला या पावसाचा जबर फटका बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरचं निवसर स्टेशनचा भराव पुन्हा एकदा खचला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच कोट्यवधी रुपये खर्च करून या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली होती. निवसर स्टेशनचा भराव खचल्याने प्लाटफार्मला भेगा पडल्या आहेत. भेगा बुजण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

X
COMMENT