विदर्भात वीज पडून / विदर्भात वीज पडून चार जणांचा मृत्यू

Agency

Jun 07,2011 11:27:48 PM IST

चंद्रपूर/ यवतमाळ: विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडून सोमवारी चार जणांचा मृत्यू झाला तर चार जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील चिकणा येथील शीतल पुडके (16) व वणी तालुक्यातील शेलू नांदेपुरा येथील वामन माधव आवारी (36) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. हे दोघे ही शेतात काम करीत होते. भद्रावती तालुक्यातील सागरा गावालगतच्या शेतात वीज पडून सुखदेव बांदूरकर (40) हे जागीच ठार झाले. तर दुसर्या घटनेत काटवल येथील राजेंद्र काशिनाथ पिंगे (55) हे शेताकडून घरी परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. वरोरा येथे शेतात काम करीत असताना वीज पडून त्यात रमेश शिवराम खंगार व शीला रमेश खंगार हे गंभीर जखमी झाले आहे.

X
COMMENT