महाराष्ट्रात बालमृत्युचे प्रमाण / महाराष्ट्रात बालमृत्युचे प्रमाण घटले

agency

Jun 02,2011 04:42:05 PM IST

नागपूर: राज्यातील बालमृत्युच्या प्रमाणात चार टक्क्यांनी घट आली असल्याचे एका अभ्यासात दिसून आले . सध्या महाराष्ट्रात बालमृत्युचे प्रमाण 32 टक्के इतके आहे. राज्यात बालमृत्युच्या प्रमाणात घट दिसत असली तरी ते सार्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनपेक्षाही अधिक आहे, असे मत नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वरीष्ठ चिकित्सक डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले आहे.

पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारतात नवजात शिशु मृत्युदर आणि बालमृत्यु दर जास्त आहे. आपल्या देशात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने चीनच्या तुलनेत आपण खुप मागे आहे, असे डॉ. बोधनकर म्हणाले.

बालमृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे गेल्या तीन वर्षांपासून इंटीग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ नियोनॅटल एॅन्ड चाइल्डहुड इलनेस (आयएमएनसीआय) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक डॉक्टर, नर्स आणि अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 2012 पर्यंत बालमृत्यु दर 30 पर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही डॉ. बोधनकर यांनी सांगितले.

X
COMMENT