मालवणात केरोसीनच्या कमी / मालवणात केरोसीनच्या कमी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण

टीम दिव्य मराठी

Jun 08,2011 05:13:59 PM IST
मालवण - जिल्हा पुरवठा विभागाकडून मालवणसाठी 60 टक्‍के केरोसीनचा पुरवठा केला जात आहे. अन्य तालुक्‍यांपेक्षा मालवणसाठी कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने किमान 80 टक्‍के केरोसीनचा पुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पालकमंत्री नारायण राणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
पालकमंत्री राणे नुकतेच येथे आले असतांना, नगरसेवक जावकर यांनी त्यांची भेट घेतली. मालवणला कमी प्रमाणात केरोसीनचा पुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा कोटा वाढवून मिळावा, यासाठी त्यांनी राणे यांचे लक्ष वेधले. या वेळी मालवणसाठी वाढीव कोटा उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन नारायण राणे यांनी दिले. तहसील कार्यालय तसेच सेतू सुविधा केंद्रातील विविध समस्याही त्यांनी पालकमंत्री राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. पुढील महिन्यात येथील दौऱ्यात आपण स्वत: तहसील कार्यालयास भेट देऊन समस्या जाणून घेऊ, असे त्यांनी सांगितले.
X
COMMENT