Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | manav vikas mission issue in hingoli

राज्याचे मानव विकास मिशन अधांतरी !

रमेश धाबे | Update - Jun 01, 2011, 12:04 AM IST

निकृष्ट आरोग्य सेवा, शिक्षणाचे कमी प्रमाण, बालमृत्यूचे वाढते प्रमाण आदी निकषांवर निवड करून तालुक्यातील मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी जून २६ मध्ये राज्य शासनाने मानव विकास मिशन सुरू केले होते.

 • manav vikas mission issue in hingoli

  हिंगोली - निकृष्ट आरोग्य सेवा, शिक्षणाचे कमी प्रमाण, बालमृत्यूचे वाढते प्रमाण आदी निकषांवर निवड करून तालुक्यातील मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी जून २६ मध्ये राज्य शासनाने मानव विकास मिशन सुरू केले होते. नवीन तालुक्यांच्या निवडी एका वर्षापासून रखडल्यामुळे जुन्या तालुक्यांमधील कामे ठप्प झाली आहेत. नवीन तालुक्यांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तालुक्यांच्या निवडीनंतर त्या तालुक्यातील विकासकामांना वेग येईल. साधारणत: ५ वर्षांपूर्वी औरंगाबाद येथे मुख्य कार्यालय स्थापन करून हे मिशन सुरू करण्यात आले. माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांच्या अध्यक्षतेखाली या मिशनची स्थापना करण्यात आली.

  २५ तालुक्यांची झाली होती पहिल्या टप्प्यात निवड
  पहिल्या टप्प्यात २५ तालुक्यांची निवड करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यासह जालना जिल्ह्यातील २, परभणी २, उस्मानाबाद ५ आणि नांदेड जिल्ह्यातील २ तालुक्यांचा समावेश आहे. याशिवाय विदर्भातील वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या ५ जिल्ह्यांतील प्रत्येकी २, खान्देशमधील धुळे जिल्ह्यातील २ आणि नंदूरबार जिल्ह्यातील १ अशा २५ तालुक्यांची पहिल्या टप्प्यात कामे सुरू झाली. पहिला टप्पा ४ वर्षांचा होता. त्यामुळे या तालुक्यांमधील कामे जून २१ मध्ये संपले.

  २५ तालुक्यांमध्ये समाधानकारक कामे झाल्याने नवीन १७२ तालुक्यांची निवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला, परंतु तालुके निवडण्यावरून जिल्ह्यात वाद निर्माण झाला. तो वाद अनेक महिने सुरू राहिला. सहा महिन्यांपूर्वी हा वाद संपुष्टात आला.

  निवडीचे निकष अत्यंत काटेकोरपणे पाळण्यात आल्याने तालुक्यांची संख्या १ वर आली. हे तालुके कोणते याची घोषणा अद्याप झालेली नाही. जुन्या २५ तालुक्यांना काही वर्षांची मुदतवाढ देऊन नव्या १ तालुक्यांसह एकूण १२५ तालुक्यांमध्ये हे मिशन राबविले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

  ५ कोटींची तरतूद
  या उपक्रमासाठी प्रत्येक वर्षाला ५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. तालुक्यांची संख्या निश्चित झाली, निधीही घोषित झाला, परंतु प्रत्यक्ष कामाची घोषणा कधी होईल याकडे लक्ष लागले आहे.

  कॅबिनेटमध्ये निर्णयाची शक्यता
  कामे रखडली आहेत आणि नव्या तालुक्यांची निवडही अद्याप घोषित झाली नाही. या सर्वाला जिल्ह्यांमधील वाद जबाबदार आहे. सरकारने वाद न घालता तालुक्यांची निवड करण्याची सूचना केली होती. त्यानुसारच काम सुरू होते, परंतु आमच्याच तालुक्याची निवड अगोदर करा, या मागणीमुळे प्रक्रिया थंडावली होती. आता हा वाद मिटला आहे.
  कृष्णा भोगे, अध्यक्ष

Trending