ठाणे महापालिकेतील माजी / ठाणे महापालिकेतील माजी सभापती मिलिंद पाटणकर यांना अटक

divya marathi

Jun 12,2011 04:03:42 PM IST

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती मिलिंद पाटणकर यांना सदनिका विक्री प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 406 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
चेंबूर येथे राहणारे विकास रामचंद्र पाथरकर यांनी ठाण्यातील नौपाडा परिसरातील "सुरुची' अपार्टमेंटमध्ये सदनिका विकत घेण्यासंबंधी "आदित्य असोसिएट' या कंपनीसह करार केला होता. यासाठी पाथरकर यांच्याकडून दहा लाख रुपये घेण्यात आले होते. पैसे घेऊनही नियोजित वेळेत फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने पाथरकर यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी मिलिंद शेंबेकर, त्याची पत्नी मिलन यांच्यासह चार जणांना अटक केली. या कंपनीत नगरसेवक मिलिंद पाटणकर हेदेखील एक भागीदार असल्याने आज त्यांनाही नौपाडा पोलिसांनी अटक केली.

X
COMMENT