कोकणात वेळेआधीच मान्सूनची हजेरी

agency

Jun 03,2011 06:55:33 PM IST

रत्नागिरी: उकाड्याने हैराण झालेल्या आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणा-या कोकणात काही भागात पावसाने आज(शुक्रवारी) दुपारी हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला. दक्षिण कोकणात यंदा पाच दिवस अगोदरच पावसाने हजेरी लावली असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. रत्नागिरीसह परिसरात दुपारपासूनच ढग गर्दी करु लागले होते. पाऊस येण्याचे चिन्हे जाणवत होती. दरम्यान, मुंबई, पुणे, औरंगाबादसह राज्यातील काही भागात दोन दिवसांपूर्वीच पाऊस हजेरी लावली आहे.X
COMMENT