येत्या ४८ तासात / येत्या ४८ तासात विदर्भात पावसाची शक्यता

Jun 19,2011 04:01:10 PM IST

नागपूर - गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या मान्सूनने विदर्भाच्या सीमेत प्रवेश केला आहे. हवामान खात्यानुसार येणाऱ्या दोन दिवसात विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार मंगळवारी (ता.१९) रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे, पुढे दोन दिवस हा पाऊस चालू राहण्याची शक्यता आहे. उत्तर बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात मान्सून दाखल झाला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियामध्ये या आधीच मान्सून आल्याची आधिकारिक घोषणा करण्यात आली आहे.

X