शिव-भीम सैनिकांची मुंबई / शिव-भीम सैनिकांची मुंबई लोकलमध्ये धिंगाणा

Jun 10,2011 12:11:25 PM IST

कल्याण: अंबरनाथ येथून सुटणारी अंबरनाथ-सीएसटी लोकलमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीच्या महामेळाव्याला जाण-या शिव-भीमसैनिकांनी चांगलाच धिंगाणा घातला. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागला. दोनशेच्या जवळपास कार्यकर्ते मोर्चासाठी अंबरनाथ स्थानकावर थांबले होते. फलाट क्र. 2 वरुन सुटणारी सीएसटी लोकमध्ये ते सर्व कार्यकर्ते शिरले आणि लोकलच्या डब्यात आणि दरवाज्यात भगवे-निळे झेंडे लावले. एवढेच नव्हे तर काही कार्यकर्त्यांनी मोर्चाचे बॅनर आणि झेंडे मोटरमनच्या कॅबिनसमोरच लावले. रेल्वे पोलिसांनी हा प्रकार थांबविण्याची विनंती केली. तर कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी बाचाबाची केली.

X