पाहुण्याने यजमानांचाच खून / पाहुण्याने यजमानांचाच खून करुन घर फोडले

Jun 08,2011 09:20:51 PM IST

एखादा पाहुणा घरी येतो, मनसोक्त पाहुणचार घेतो आणि यजमानांचा खून करुन जातो हा खळबळजनक प्रकार ठाण्यातील नालासोपार भागात घडला आहे. चंद्रेश शक्ती सोसायटीत राहणा-या शालिनी तारानाथ शेट्टी यांच्याकडे त्यांचा नातेवाईक अशोक शेट्टी आला. त्यांनी त्याचा मनसोक्त पाहुणचार केला. दुस-या दिवशी अशोक निघून ही गेला. मात्र अशोकने जाण्याचे फक्त नाटक केले. त्याचा डाव काही वेगळाच होता.
अशोकचा डोळा होता शालिनीच्या दागिण्यांवर. अशोक गेल्यानंतर शालिनीचा नवराही कामानिमीत्त घराबाहेर गेला. याच संधीचा फायदा घेत दुपारी अशोक परत आला आणि त्याने शालिनीचा खून करुन तिच्या जवळील 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार झाला.
याप्रकरणी नालासोपारा पोलीसांनी प्रथम अकस्मिक गुन्ह्याची नोंद केली, मात्र अधिक तपास केला असता, हा खूनाचा गुन्हा उघड झाला. आरोपी अशोकला कर्नाटकातून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

X