एन-३२ विमानाचे आयुष्य / एन-३२ विमानाचे आयुष्य वाढले; आता ४० वर्षे उडणार

Jun 23,2011 10:31:12 AM IST

भारतीय वायुसेनेच्या जवानांसाठी असलेले प्रवासी विमान एन-३२ आता २५ वर्षांंऐवजी ४० वर्षे सेवा देऊ शकणार आहे. वायुसेनेचे प्रवक्ता विंग कमांडर संदीप मेहता यांनी सांगितले की, कानपुरातील चाकेरी वायुसेना स्टेशनवर मंगळवारी एन-३२ च्या सेवेचा कालावधी वाढविण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू झालेली आहे.

वायुसेना अनुरक्षण कमान मुख्यालयाचे प्रमुख एअर मार्शल पी. व्ही. आठवले यांनी या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखविला. एन-३२ चे आयुष्यमान वाढणार म्हणून सारेच त्यात हिरीरीने सहभागी झाले.

‘गजराज’ विमानानंतर सर्वाधिक उपयोगाचे
कानपूरच्या बेसिक रिपेअर डेपोत किती तरी वर्षांपासून एन-३२ विमानाची देखभाल-दुरुस्ती होत आलेली आहे. आता इथेच या विमानाचा सेवा कालावधी वाढविण्याचे काम करावे लागणार आहे. विमानाचे जुने भाग बदलून नवे अद्ययावत भाग बसविले जाणार आहेत. यासंदर्भात युक्रेनला पाठविण्यात आलेली एन-३२ विमानांची पहिली खेप परत आलेली आहे. मेहता यांनी सांगितले की, देशातील वायुसेना तांत्रिक कर्मचाºयांना आणि पायलट्सना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. एन-३२ विमान १९८४ मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल केले गेले होते. आयएल ७६ म्हणजेच ‘गजराज’नंतर सर्वाधिक एन-३२ विमानांचा उपयोग जवानांच्या प्रवासासाठी केला जातो. प्रारंभिक काळात या विमानांचा उपयोग घोड्यांची ने-आण करण्यासाठी केला जाई. हे विमान नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचावकार्यासाठीही उपयुक्त ठरले आहे.

X