Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | nagar-incrohment-in-kham-river-

पालिका अधिका-यास आमदाराने बदडले

divya marathi team | Update - Jun 04, 2011, 01:41 AM IST

शहरातील चितळे रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना शुक्रवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांना आमदार अनिल राठोड यांनी मारहाण केली.

  • nagar-incrohment-in-kham-river-

    अहमदनगर - शहरातील चितळे रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना शुक्रवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांना आमदार अनिल राठोड यांनी मारहाण केली. त्यामुळे पालिका कर्मचा-यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
    शहरातील अतिक्रमणांविरुद्ध गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिकेची कारवाई सुरू आहे.

    येथील चितळे रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास दाखल झाले. अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू असतानाच आमदार अनिल राठोड तेथे आले. यानंतर त्यांनी रिजवान शेख यांना बाजूला घेत अतिक्रमण कारवाईबाबत विचारपूस केली. त्यानंतर अचानकच राठोड यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे चितळे रोड परिसरात तणाव निर्माण झाला. ही घटना घडल्यानंतर रिजवान शेख यांनी महानगरपालिकेत धाव घेतली. झालेल्या प्रकाराची माहिती त्यांनी आयुक्त काकडे यांना दिली. यावर आयुक्त काकडे यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. रात्रीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेले पालिका कर्मचारी चितळे रोड अतिक्रमण हटाव मोहीम अध्र्यावरच सोडून महानगरपालिकेत दाखल झाले. आमादारांच्या गुंडगिरीविरोधात कर्मचा:यांनी घोषणाबाजी केली. आमदारांवर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई न झाल्यास महापालिकेतील कामकाज बंद करण्याचा इशाराही या वेळी कर्माचारी संघटनेने दिला.

Trending